तडजोड
तडजोड........ ह्या प्रापंचिक जगात वावरताना प्रत्येक जण लहान पणा पासून ते मोठे होई पर्यंत तडजोड करत च जगतोय. मग ती तडजोड माणसांच्या बाबतील केलेली असो की निर्जीव वस्तू साठी. सगळे करताना फक्त मनाची समजूत घालत जगणे. कधी कधी या तडजोडी चा ही वीट येतो. असे वाटते मग आपणच का?
बर ही तडजोड करत आपण जगतोय पण ज्याच्या साठी आपण तडजोड करत जगतोय त्यालाच जर त्याची किंमत नसेल तर सगळे गणित शून्य होऊन जाते. नावाडी नसलेल्याला नौके सारखे भरकटत जाते आयुष्य. मग प्रश्न पडतो जगायचे ते नक्की कोणासाठी?