नाती

काही नाती कधी कधी हवीहवीशी वाटतात तर काही नाती ओझी बनवून आयुष्यभर वागवायला लागतात. निस्वार्थ नाते जास्त भावून जाते. जिथे स्वार्थ साधून नाते जोडले असेल त्याला तात्पुरती झळाळी असते. त्यात ना आपुलकी ना ओढ. फक्त formally म्हणुन सगळे पार पाडले जाते. खरी नाती ती ही फक्त प्रेम, आपुलकी ची भुकेली असतात. घेण्या देण्यात interest नसतो तर मने जपण्यात जास्त आनंद असतो.
     देवाने प्रत्येकाला खूप काही दिलेले आहे. आज प्रत्येकाकडे पैसा अडका आहे पण कमी आहे ती आपल्या नात्यांची. आपल्या माणसांची. माणूस पैसा येत गेला तसा थोडा अहंकारी झाला. त्यांची lifestyle, status सगळे च बदलले. त्यात नाती पण मागे पडलीय. खूप पुढे निघून गेल्यावर त्याला ह्या नात्याच्या चौकटीचे गणित लक्षात आले. मग त्यातून social media नावाचे आभासी जग निर्माण झाले. इथे खूप भेटतातच हो पण तो नात्यातील ओलावा नाही भेटत त्याचे काय? आपल्याला झालेला आनंद आणि दुःख दोन्ही व्यक्त करायला आपल्या माणसाचा खांदा पाहिजे हे नक्की. ❤️