उन्हाळ्याची सुट्टी

पूर्वी 13 एप्रिल ला परीक्षा संपल्या की लहान मुलांची, सासुरवाशीण ची नुसती लगभग उडायची. बाई ला ओढ असायची माहेरी जायची तर मुलांना आजोळी. ते दिवसच किती वेगळे होते. घारे मोठी असायची, वाडा असायचा. शहरी मुलांना गावाकडचे ते वातावरण हवेसे वाटायचे. दिवस भर खाणे आणि खेळणे. एकमेकांच्या मदतीने मोठी कामे पण हे इवले हात पार पाडायचे. आम्ही ही मामा, मावशी, काका कुठे ही गेलो की full to धमाल असायची. चिंचा, कैर्‍या गोळा करून धुवून, फोडून त्यावर मीठ, मिरची घालून खायची मज्जा शब्दात व्यक्त नाही करता येणार. आम्ही मुंबई ला रहायला त्यामुळे विहिरी वरुन पाणी भरणे, हात पंप चालवणे, पाटाच्या पाण्यात कपड़े धुवायला जाणे एकदम पर्वणी. मावशी ला मस्का मारून मारून आम्ही 15 ते 20 जण निघायचे तिच्या मागे. तिकडेच कपड़े धुवून जेवण करून खेळून मग घरी यायचे. झाडा खाली मस्त जेवायचे, आराम करायचा त्याची सर आताच्या cooler च्या आणि AC च्या हवेत नाही. आजी च्या जवळ झोपून गोष्टी ऐकण्याचे भाग्य लाभलेली आमची पिढी. बाहेर अंगणात चांदणे बघत कधी झोप लागायची कळायचे ही नाही. सुट्टी संपत येणार म्हंटले की तोंडे बारीक होऊन जायची. सगळे मोठे होत गेले हळू हळू येणे जाणे कमी झाले. आता सगळे भेटतात लग्नात, कार्यक्रमात. निघतात त्या गोड आठवणी. पण खंत वाटते की आमच्या मुलांना आमच्या सारखे लहान पण नाही जगता येत आहे. आता त्याचे जग सोशल मीडिया, games ने भरले आहे. असो काळा चा महिमा.