Posts

वृत्ती

वृत्ती. शब्द छोटा आहे पण प्रत्येकाला ह्या वृत्तीचा अनुभव कधी ना कधी येतोच. काही जण छोट्या छोट्या गोष्टी च्या मध्ये आनंद शोधत असतात. तो हातातून निसटून गेलेले काही क्षण गोळा करत असतो. पण हे जगत असताना समोरच्याच्या मनातील आपल्या विषयी च्या भावना वाचता आल्या तर किती तो आनंद. शेवटी वृत्ती...... उगीचच टोमणे मारून दुसर्‍याच्या आनंदावर विरजण घालण्याची ही कोणती वृत्ती?आपण उगीचच सगळे आपल्या विषयी चांगलाच विचार करत असतील ह्या वृत्तीचे. पण काही जण........ असो. व्यक्ति तितक्या वृत्ती आणि प्रवृत्ती. 😍अनुभवा सारखा गुरु नाही. स्वतःच्या बाबतीत हे लोक सगळे नियम धाब्यावर बसवून आनंद घेतात फक्त त्याला नाव त्यांच्या सोयी नुसार देणार. ह्या वृत्ती माणसांनी बदलाव्या म्हणजे दुसर्‍याला होणारा मानसिक त्रास कमी होईल. 

उन्हाळ्याची सुट्टी

पूर्वी 13 एप्रिल ला परीक्षा संपल्या की लहान मुलांची, सासुरवाशीण ची नुसती लगभग उडायची. बाई ला ओढ असायची माहेरी जायची तर मुलांना आजोळी. ते दिवसच किती वेगळे होते. घारे मोठी असायची, वाडा असायचा. शहरी मुलांना गावाकडचे ते वातावरण हवेसे वाटायचे. दिवस भर खाणे आणि खेळणे. एकमेकांच्या मदतीने मोठी कामे पण हे इवले हात पार पाडायचे. आम्ही ही मामा, मावशी, काका कुठे ही गेलो की full to धमाल असायची. चिंचा, कैर्‍या गोळा करून धुवून, फोडून त्यावर मीठ, मिरची घालून खायची मज्जा शब्दात व्यक्त नाही करता येणार. आम्ही मुंबई ला रहायला त्यामुळे विहिरी वरुन पाणी भरणे, हात पंप चालवणे, पाटाच्या पाण्यात कपड़े धुवायला जाणे एकदम पर्वणी. मावशी ला मस्का मारून मारून आम्ही 15 ते 20 जण निघायचे तिच्या मागे. तिकडेच कपड़े धुवून जेवण करून खेळून मग घरी यायचे. झाडा खाली मस्त जेवायचे, आराम करायचा त्याची सर आताच्या cooler च्या आणि AC च्या हवेत नाही. आजी च्या जवळ झोपून गोष्टी ऐकण्याचे भाग्य लाभलेली आमची पिढी. बाहेर अंगणात चांदणे बघत कधी झोप लागायची कळायचे ही नाही. सुट्टी संपत येणार म्हंटले की तोंडे बारीक होऊन जायची. सगळे मोठे होत गेले ...

नाती

काही नाती कधी कधी हवीहवीशी वाटतात तर काही नाती ओझी बनवून आयुष्यभर वागवायला लागतात. निस्वार्थ नाते जास्त भावून जाते. जिथे स्वार्थ साधून नाते जोडले असेल त्याला तात्पुरती झळाळी असते. त्यात ना आपुलकी ना ओढ. फक्त formally म्हणुन सगळे पार पाडले जाते. खरी नाती ती ही फक्त प्रेम, आपुलकी ची भुकेली असतात. घेण्या देण्यात interest नसतो तर मने जपण्यात जास्त आनंद असतो.      देवाने प्रत्येकाला खूप काही दिलेले आहे. आज प्रत्येकाकडे पैसा अडका आहे पण कमी आहे ती आपल्या नात्यांची. आपल्या माणसांची. माणूस पैसा येत गेला तसा थोडा अहंकारी झाला. त्यांची lifestyle, status सगळे च बदलले. त्यात नाती पण मागे पडलीय. खूप पुढे निघून गेल्यावर त्याला ह्या नात्याच्या चौकटीचे गणित लक्षात आले. मग त्यातून social media नावाचे आभासी जग निर्माण झाले. इथे खूप भेटतातच हो पण तो नात्यातील ओलावा नाही भेटत त्याचे काय? आपल्याला झालेला आनंद आणि दुःख दोन्ही व्यक्त करायला आपल्या माणसाचा खांदा पाहिजे हे नक्की. ❤️

तडजोड

तडजोड........ ह्या प्रापंचिक जगात वावरताना प्रत्येक जण लहान पणा पासून ते मोठे होई पर्यंत तडजोड करत च जगतोय. मग ती तडजोड माणसांच्या बाबतील केलेली असो की निर्जीव वस्तू साठी. सगळे करताना फक्त मनाची समजूत घालत जगणे. कधी कधी या तडजोडी चा ही वीट येतो. असे वाटते मग आपणच का?           बर ही तडजोड करत आपण जगतोय पण ज्याच्या साठी आपण तडजोड करत जगतोय त्यालाच जर त्याची किंमत नसेल तर सगळे गणित शून्य होऊन जाते. नावाडी नसलेल्याला नौके सारखे भरकटत जाते आयुष्य. मग प्रश्न पडतो जगायचे ते नक्की कोणासाठी ?